एक्स्प्लोर
लग्नाहून परतताना ट्रक आणि मॅक्सची धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू
गडचिरोली : गडचिरोलीत सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 8 जण जखमी झाले आहे. उमानूर गावाजवळ हा अपघात झाला आहे.
लग्नकार्याहून घरी परतत असताना पहाटे 3 वाजता ट्रक आणि मॅक्समध्ये जोरदार धडक झाली. गाडीत एकूण 14 जण होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला.
या अपघातातील सर्व मृत देचलीपेठा गावाचे रहिवासी आहेत. लग्नकार्य आटपून परतत असताना देचलीपेठा उमानूर गावाजवळ हा अपघात झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement