हिंसाचाराला कंटाळून 2 जहाल माओवाद्यांचं पोलिसांना आत्मसमर्पण, गेल्या 30 वर्षांपासून चळवळीत सक्रीय
चळवळीत सक्रिय असलेला जहाल माओवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत
Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठे यश आले आहे. दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सिआरपीएफ) समोर आत्मसमर्पण केले.गेल्या ३० वर्षांपासून माओवादी संघटनांमध्ये सक्रीय असणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानं माओवादी चळवळीला हादरा बसलाय.आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 55 वर्षीय रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (एसीएम), रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली आणि 25 वर्षीय रमेश शामु कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य), रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
रामसु दुर्गु पोयाम माओवादी संघटनेत गेल्या 30 वर्षांपासून सक्रिय होते. शासनाने त्याच्यावर 8 लाख रुपये आणि रमेश कुंजामवर 2 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 680 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
खून दरोडा, चकमकींची गुन्हे
चळवळीत सक्रिय असलेला जहाल माओवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. यातील रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा 1992 पासून नक्षलवादी चळवळीत आहे. 1992 मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.1995 मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन 1996 पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करत होता. नंतर तो टिपागड दलमसाठी काम करत राहिला आणि 2001 पर्यंत छत्तीसगडमधील माड एरिया पुरवठा टीममध्ये त्याची बदली झाली. 2010 पासून तो कुतुल व नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर एकूण 12 गुन्हे नोंद आहेत, ज्यात 6 चकमकी, 5 खून, आणि 1 दरोड्याचा समावेश आहे.
कल्याणमध्ये अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले
मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एकापाठोपाठ एक कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) हा अजमेरा हाईटस् सोसायटीतील रहिवाशांना सनदी अधिकारी (IAS officer) असल्याचे सांगून धमकावत होता. तो खासगी गाडीवर अंबर दिवा लावून टेचात फिरायचा. अखिलेश शुक्ला आयएएस अधिकारी सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शुक्ला त्याच्या खासगी गाडीमध्ये अंबर दिवा लावून रुबाब करत होता. मात्र, त्याचा हाच रुबाब आता पोलिसांनी उतरवला आहे.