Sangli Rain : परतीच्या पावसानं टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान
सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. या पावसात भिजून कोलमडलेल्या टोमॅटोवर (Tomato) करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
Sangli Rain : परतीच्या पावसानं (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. या पावसात भिजून कोलमडलेल्या टोमॅटोवर (Tomato) करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच बुरशीजन्य रोगानं देखील टोमॅटो पिकावर विळखा घातला आहे. तसेच भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, अद्यापही पिकांचे पंचनामे झाले नाहीत. शेतकरी अजूनही पंचनामाच्या प्रतिक्षेत आहेत.
शिल्लक राहिलेला टोमॅटो लागला कुजू
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटो शेतकरी अद्यापही पंचनामाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडं अजून पंचनामा झाला नसताना दुसरीकडे शेतातील शिल्लक राहिलेला टॉमेटा देखील कुजू लागला आहे. त्यामुळं टोमॅटो लावून भरघोस उत्पादन घेऊन चांगली दिवाळी होईल या आशेवर बसलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. अति पावसाने टोमॅटोच्या बागा करपा रोगानं वेढून गेल्या आहेत. या मुसळधार पावसानं सांगली जिल्ह्यातील भाजीपाला आणि टोमॅटो शेतकरी संकटात आला आहे. अनेकांच्या टोमॅटोच्या बागा पावसाने कोलमाडल्या आहेत. कोलमडलेल्या टोमॅटोवर करपा, बुरशीजन्य रोग येत आहे. त्यामुळे उत्पादक टोमॅटो उत्पादक शेतकरी पंचनामाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश काढूनही अजून संबंधित विभागाकडे आदेश आलेला नाही. त्यामुळं संबंधित विभाग सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. किमान शासनाकडून याचे पंचनामे करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
मचं लाखो रुपायांचं नुकसान, शासनानं तातडीनं दखल घ्यावी
मागच्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसानं माझ्या एक एकर टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 50 टक्के नुकसान झालं होत. त्यानंतर मी टोमॅटोचा प्लॉट उभा केला होता. मात्र, पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं उरलं सुरलं पिकंसुद्धा वाया गेल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली. पण अजूनही आमच्या शेतावर एकही शासकीय अधिकारी आला नाही. आमचं लाखो रुपायांचं नुकसान झालं आहे. आमची तातडीनं दखल घ्यावी. कारण लाखो रुपयांचा खर्च करुन पिकं आणलं होतं, आता ते पूर्ण पिक वाया गेलं असून पदरात काहीच पडलं नसल्याची खंत शेतकरी प्रकाश सूर्यवंशी यांनी बोलून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या: