एक्स्प्लोर

जामताराच्या ठगांनी अल्पवयीन मुलीला फितवलं; 'फ्री फायर गेम'च्या नादात बुलढाण्यातील 12 वर्षाची मुलगी पोहोचली थेट झारखंडला

Free Fire Online Game :  फ्री फायर गेमच्या नादात बुलढाण्यातील एक 12 वर्षाची मुलगी जामताराच्या (Jamtara) ठगांच्या हाती लागली. तिला त्यांनी फितवलं आणि चक्क झारखंडला नेल्याची धक्कादायक घटना घडली.

मुंबई : ऑनलाईन गेम म्हणजे सध्या टाईमपास करण्याचा विषय राहिला नसून ते एक व्यसन झाल्याचं दिसतंय. ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे, अनेक जणांच्या आयुष्याची वाट लागल्याचं समोर आलंय. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यातील सातवीत शिकणारी एक 12 वर्षाची मुलगी फ्री फायर (Free Fire Online Game) या ऑनलाईन गेमच्या व्यसनी गेली आणि तिने चक्क घर सोडलं. हा गेम खेळताना ती जामताराच्या (Jamtara) ठगांच्या हाती लागली आणि थेट झारखंडला जाऊन पोहोचली. सध्या या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणच्या एका सातवीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीला फ्री फायर या ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं. हा गेम खेळताना तिची ओळख काही अनोळख्या मुलांशी झाली. त्या मुलांनी या सातवीत शिकणाऱ्या मुलीला फितवलं आणि चक्क घर सोडायला भाग पाडलं. त्या मुलीनेही या अनोळखी मित्रांच्या सांगण्यावरून घर सोडलं. ही बाब लक्षात येताच त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 

जामताराच्या ठगांच्या हाती
झारखंडमधील लालू प्रसाद वर्मा (वय 22) आणइ विकास तुरी (वय 23) हे दोन युवक महाराष्ट्रात आले. गेल्या चार महिन्यांपासून ते या फ्री फायर ऑनलाईन गेम खेळणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होते. ते सातत्याने तिच्याशी चॅटवर बोलत होते. या दोघांनी तिला फितवलं आणि तिला पळवून  थेट झारखंडमधील गिरीडिग या ठिकाणी एका नातेवाईकाकडे घेऊन गेले. 

या घटनेची झारखंडमधील अहिल्यापूर पोलिसांना कोणीतरी गुप्त माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गिरीडिह या ठिकाणी झापा मारला आणि या दोन ठगांना अटक केली. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीची सुटका केली.

झारखंड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर बुलढाणा पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं.  या आरोपीना ट्रान्जिड रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं.

फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या नादात एका मुलगी घर सोडून निघुन गेल्याची घटना मलकापूरात घडली. नेहमी ऑनलाइन गेम खेळत असताना अनेक अनोळखी मित्रांशी तिची ओळख झाली. अशातच झारखंड मधील दोन तरुणांनी तिला धमकाऊन जामतारा येथे घेऊन गेले. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी या मुलीला शोधुन तिची सुखरुप सुटका केलीय.  

 मलकापूर शहरातील एक सातवीत शिकणारी 12 वर्षीय मुलगी फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या नादात घरून निघून गेली ती सापडली साधारण 1580 किलोमीटर दूर असलेल्या झारखंड मध्ये....ती नेहमी ऑनलाइन गेम खेळत असताना अनेक अनोळखी मित्रांशी तिची ओळख झाली. अशातच झारखंड मधील जामतारा येथील दोघे जणांनी तिचा मोबाईल हॅक करून तिला धमक्या देऊन थेट मलकापूर येथे येऊन तिला मलकापूरहुन भुसावळ ते जामतारा येथे घेऊन गेले. मुलगी पोलिसांच्या हाती लागली आणि तिची सुटका झाली.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Embed widget