एक्स्प्लोर
अपत्यप्राप्तीसाठी भोंदूबाबाने गोळ्या दिल्या, महिला झाली लठ्ठ!
अपत्यप्राप्तीसाठी तक्रारदार महिला भोंदूबाबाकडे गेली होती. भोंदूबाबाने मूल होण्याच्या गोळ्यांच्या नावाखाली तिला 55 हजारांची औषधं लिहून दिली.
सोलापूर : मूल होण्याच्या आशेने भोंदूबाबाने दिलेल्या गोळ्या खाणं महिलेच्या अंगलट आलं आहे. मूल तर अर्थातच झालं नाही, मात्र सोलापुरातील संबंधित महिलेला लठ्ठपणाने ग्रासलं. आरोपी सागर भस्मेला पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील वैराग गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. अपत्यप्राप्तीसाठी तक्रारदार महिला भोंदूबाबाकडे गेली होती. भोंदूबाबाने मूल होण्याच्या गोळ्यांच्या नावाखाली तिला 55 हजारांची औषधं लिहून दिली.
पाळणा हलण्याच्या आशेने ही महिला नियमितपणे गोळ्या खात राहिली. मूल होणं आणि औषधाचा काहीच संबंध नसल्याने ती गर्भवती तर राहिली नाहीच, मात्र गोळ्यांचे साईड इफेक्ट्स तिला जाणवायला लागले.
काही दिवसांतच महिलेचं वजन वाढायला लागलं. आपली फसवणूक झाल्याचं अखेर या महिलेच्या ध्यानात आलं आणि तिने भोंदूबाबाकडे मोर्चा वळवला. मात्र तोपर्यंत हे महाशय गाशा गुंडाळून पसार झाले होते.
हताश झालेल्या महिलेने फरार झालेल्या भोंदूबाबाचा कसून शोध घेतला. सोलापूरहून तिनेच थेट उस्मानाबाद गाठलं आणि भोंदूबाबाला शोधून काढलं. अखेर भोंदूबाबाला तिने सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement