एक्स्प्लोर
कपडे धुताना पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू
लातूर : कपडे धुवायला गेले असताना पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या हाकनाकवाडी परिसरात ही घटना घडली.
नवरात्रीच्या निमित्ताने डोंगरशेलकी रस्त्यावरच्या खणीत कपडे धुवायला चौघी जणी गेल्या होत्या. त्यावेळी 5 वर्षांची अनुसया मोहन करलेवाड, 27 वर्षीय राधिका मोहन करलेवाड, 16 वर्षीय गवलण बलिराम करलेवाड आणि 18 वर्षीय अश्विनी बलिराम करलेवाड यांचा मृत्यू झाला.
अनुसया आणि राधिका या मायलेकी असून गवलण आणि अश्विनी या बहिणी होत्या. एकाच कुटुंबातील चार महिलांच्या अपघाती मृत्यूमुळे करलेवाड कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement