नागपूर-भंडारा मार्गावर लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
नागपूर-भंडारा रोडवरच्या शिंगोरी गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर ही बस जाऊन धडकली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
नागपूर : नागपूर-भंडारा रोडवर लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. वऱ्हाड घेऊन जाणारी बस रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर काहींना भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नागपूरहून लग्नाचं वऱ्हाड गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गेलं होतं. तिथून लग्न समारंभ संपवून पहाटे अडीच वाजता वऱ्हाड नागपूरसाठी निघालं होतं. पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावाजवळ बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की यात दोघांचा जागीच तर इतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. नागपूर पोलीस दलात पोलीस शिपाई असलेले अरविंद झिलपे यांच्या पुतण्याच्या लग्नाचं हे वऱ्हाड होतं.
मृतांची नावे
1) विठाबाई झिलपे (वय 72 वर्ष) 2) करुणा खोडे (वय 58 वर्ष) 3) आनंद आठवले (वय 25 वर्ष) 4) सतीश जांभूळकर (वय 35 वर्ष)