यवतमाळमध्ये देवदर्शनाला जाताना झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी
यवतमाळमध्ये झालेल्या अपघातातील जखमींना राळेगाव आणि वडनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यवतमाळ : देवदर्शनासाठी जातान कार आणि ऑटोमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रिधोरा गाव परिसरातील हा अपघात झाला आहे.
रिधोरा गावातील काही जण वर्धा जिल्ह्याच्या आजनसरा येथे वाढदिवसाचा कार्यक्रम आणि देवदर्शनाला ऑटोने जात होते. दरम्यान वडकी गावाजवळ ऑटोला फोर्ड कारने समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती ऑटोतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना राळेगाव आणि वडनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अरविंद बोरुले, उमा शेंडे, येनुबाई जुमनाके अशी मृतांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये ऑटोचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर रिधोरा गावामध्ये या अपघातामुळे शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
