श्रीमंत म्हणून विश्वास ठेवला पण त्यांनी तिजोरी लुटली, रणजितसिंह निंबाळकरांचा रामराजेंवर हल्लाबोल
श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalak) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
Ranjitsinh Naik Nimbalkar on Ramraje Naik Nimbalkar : श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalak) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करुन श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रामराजेंवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर लोकप्रतिनिधी व श्रीमंत म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तिजोरी लुटली हे फलटण तालुक्याचे दुर्दैव असल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. फलटण तालुक्यातील सहकारी संस्था रामराजेंनी अक्षरश विकण्यास काढल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. फलटण तालुक्यातील तरुणांनी रामराजेंना आता घरी बसवण्याचं ठरवलं आहे, अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज केलं
कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज केलं आहे. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. कारखान्यात काहीही ठेवलं नाही. शिक्षणावर जर तुमचा पराक्रम असता तर तुम्ही बारामतीच्या बरोबर घेऊन गेला असता असा टोला त्यांन रामराजेंना लगावला. 20 वर्षापूर्वीचा ऐकेकाळचा फलटणचा 1 लाख लिटरचा दूध संघ भंगारात जमा झाला आहे. जमिन विकली, मशनरी विकायला काढली तो शून्य लिटरवर आणला आहे. श्रीराम कारखान्यातही मोठा भ्रष्टाचार केला आहे. मालोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेवर निर्बंध लावले. तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ गायब आहे. मार्केट कमिटीत सहा महिन्यांचे पगार नाहीत अशी टिका रणजित निंबाळकर यांनी रामराजेंवर केला. पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्ष भाड्यानं दिलं होतं अशी टीकाही त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून माजी खासदार आणि भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य केलं होतं. त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे यांच्यावर सातत्याने आरोप केले. तसेच रामराजेंनी दिली जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
महत्वाच्या बातम्या:
Ramraje Naik Nimbalkar : सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच, रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा, फलटण साताऱ्यात राजकीय संघर्ष वाढणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

