एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची मागणी  

Uddhav Thackeray PC  : "निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray PC  : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

"पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करावा. कोर्टात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही. सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  

"आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत असाच वाद झाला होता. बाकी कुणालाही अशा प्रकारे देण्यात आलेलं नाही. मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्र आम्ही दिली आहेत. मात्र याची चौकशी झाली आणि असं काहीचं नसल्याचं समोर आले. आम्ही लाखोंनी कागदपत्रं दिली, मात्र त्याचं पुढं काय झालं? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उद्धव  ठाकरे यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं आहे. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांचे फोन आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. " या निकालानंतर मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा फोन आला. नितीश कुमारांचा देखील फोन आला. शरद पवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधून, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

नाव आणि चिन्ह चोरण्याचा पूर्वनियोजीत कट

"माझं नाव आणि चिन्ह चोरलं आहे. हा पूर्वनियोजीत कट आहे. माँ साहेबांच्या पोटी जन्माला मी आलो आहे हे भाग्य त्यांना मिळणारं नाही. हे  भाग्य त्यांना चोरता नाही किंवा दिल्लीला देखील देता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 2024 सालची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्यांचा यांनतर देशात नंगानाच  सुरु होणार आहे. आता जर जागे नाही झालो तर उशीर होईल. आता सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापुरात बोलताना अमित शाह मला वडिलांसारखे आहेत असं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी यावरूनही जोरदार टीका केली. "कोण तरी म्हणाले अमित शाह माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे वडील चोरले आणखी कुणा कुणाला चोरणार माहिती नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.   

महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray PC : निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी, शिंदेंवर आसूड, भाजपचा समाचार; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे 

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget