Solapur : अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
Solapur News Update : अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Solapur News Update : अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत अहमदनरचे असून ते अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
अहमदनगरमधील भाविक कर्नाटकातील गाणगापूरला दर्शनासाठी आले होते. गाणगापूरहून अक्कलकोट मार्गे अहमदनगरला परत जात असताना कर्नाटकमधील बळोरगी गावाजवळ चालकाचा गाडीवरून ताबा सुटला. त्यामुळे गाडी झाडाला आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून कर्नाटकातील अफझलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदत करत कारमधील सर्व मृतदेह बाहेर काढले आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. स्थानिकांनीच या अपघाताची पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटमधील अफझलपूर शासकीय रूग्णालयात पाठवले. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. समोरूनच झाडाला धडक दिल्यामुळे गाडीच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. काचा फुटल्यामुळे अथक परिश्रमानंतर स्थानिकांनी कारमधील मृतदेह बाहेर काढले. जखमी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, देव दर्शनाहून परत येत असतानाच काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Defence Ministry Update: भारताच्या मिसाईलचा निशाणा थेट पाकिस्तानमध्ये; मिसाईल चुकून डागल्याचं सांगत भारताकडून खेद व्यक्त
- कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्यावर गोळीबार; कराचीत बाईकस्वारांकडून हत्या
- Russia Ukraine War: इतिहास सांगतोय..., भारताच्या मैत्रीखातर एकदा नाही तर तीनवेळा रशिया अमेरिकेला नडलाय
- quadcopter shot down by BSF : भारतीय हद्दीत पाकिस्तानचे ड्रोन, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करुन पाडले