एक्स्प्लोर
अमरावतीमध्ये मुलींच्या वसतीगृहात रॅगिंगप्रकरणी पाच मुलींना अटक
अमरावतीच्या विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वसतीगृहात मुलीची रॅगिंग केल्याप्रकरणी पाच मुलींना अटक करण्यात आली होती.
अमरावती : अमरावतीच्या विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वसतीगृहात मुलीची रॅगिंग केल्याप्रकरणी पाच मुलींना अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
अमरावतीच्या व्हीएमव्ही म्हणजेच विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वसतीगृहात 27 ऑगस्ट रोजी रॅगिंग करण्यात आल्याचं उघडकीस आलं होतं. वसतीगृहातल्या 5 मुलींनी ज्युनिअर मुलीला कपडे काढायला सांगून, अश्लीलरित्या तिची रॅगिंग केली.
या प्रकरणी पीडित मुलीनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली, यानंतर पाच मुलींना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, याआधी ही वसतीगृहात 46 मुलींची रॅगिंग झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे या घटनेनंतर वसतीगृहाच्या प्रशासनावरही टीका केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement