![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा
धुळ्यातील खोरदड तांडा इथल्या बंजारा जातपंचायतीने पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याची घटना घडली आहे. यानंतर पीडिताने गृहमंत्र्यांना उद्देशून ट्वीट केलं. गृहमंत्र्यांनी या ट्वीटची दखल घेतली. यानंतर अखेर जातपंचायत सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा Five families socially boycotted by jat panchayat in Dhule, after Home Ministers order FIR lodged against panchs धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/08134248/Dhule-Families-Boycott.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळे : धुळे तालुक्यातील खोरदड तांडा येथील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी तेथील समाजबांधव दीपक सोमा राठोड यांच्या कुटुंबासह पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याने हे पाचही कुटुंब गावाबाहेर राहत आहेत. त्यामुळे दीपक राठोड यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून ट्वीट करुन न्याय देण्याची विनंती केली होती. गृहखात्याने या ट्वीटची दखल घेत पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
.@SpDhule आपण सदर प्रकरणात लक्ष घालावे. @DipakRa52019643 सदर घटनेची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तुमची ५ कुटुंब आणि मुलांबद्दल माझी सहानुभूती आहे. https://t.co/hBHR8WGOxf
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 6, 2020
खोरदड तांडा गावातील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी पाच कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याने ते सध्या गावाच्या बाहेर राहत आहेत. पीडित कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु न देणं, गावात किराणा, औषधं खरेदी करु न देणं, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणं, समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी यात हजर राहू न देणे, मुला-मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबांना खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच केल्याची व्यथा दीपक राठोड यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मांडली. 14 सप्टेंबर 2019 ते 28 मे 2020 पर्यंत हा छळ झाल्याचं दीपक सोमा राठोड यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
वर्षभरापूर्वी विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला दीपक राठोड याचे वडील सोमा राठोड यांनी जामीन दिला होता. याचा राग जातपंचायत सदस्यांना आला, त्यातून त्यांनी समाजातून बहिष्कृत केल्याची आपबिती दीपक राठोड याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपुढे कथन केली. विशेष म्हणजे जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या पाच कुटुंबात विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कुटुंबाचा देखील समावेश असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)