एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकावर अज्ञातांकडून गोळीबार
बाजारपेठेतून निघालेल्या विशाल यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून राजेश खंडेलवाल घटनास्थळी आले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावरही बंदूक रोखून धरली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या देहूरोडमध्ये भाजप नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शीवर बंदूक रोखून धरली. सायंकाळी साडे सातच्या सुमारास भर बाजार पेठेत हा प्रकार घडला.
विशाल खंडेलवाल असं नगरसेवकाचं नाव असून ते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक आहेत. बाजारपेठेतून निघालेल्या विशाल यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून राजेश खंडेलवाल घटनास्थळी आले, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावरही बंदूक रोखून धरली.
कसेबसे विशाल आणि राजेश त्यांच्या तावडीतून निसटल्याने सुखरूप बचावले. पण धावताना विशाल खाली पडल्याने त्यांच्या पायाला जखम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड झाली होती.
भरदिवसा नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत ही तोडफोड केली गेली. त्यानंतर आज ही घटना घडली. नगरसेवकांवरच असे हल्ले होऊ लागल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement