एक्स्प्लोर

आनेवाडी टोलनाका आंदोलन; आमदार शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल

आंदोलन करुन साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडल्याप्रकरणी साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तीन दिवसांपूर्वी (18 डिसेंबर) आंदोलन करुन पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. या आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्या 80 कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम दिलेला असूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक होऊन आंदोलन केले. तसेच त्यांनी आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ आनेवाडी येथे हा टोलनाका आहे. पुणे साताऱ्यादरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्याचबरोबर या महामार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. टोल प्रशासनाकडूनही कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. प्रसाधनगृहांअभावी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे, असे दावे शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.

एकीकडे प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र दुसऱ्या बाजूला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. त्यामुळे 15 दिवसांच्या आत प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवा, खड्डे बुजवा नाहीतर टोल बंद पाडू असा अल्टिमेटम शिवेंद्रराजेंनी 15 दिवसांपूर्वी दिला होता. परंतु 15 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही कार्यवाहा केली नाही. परिणामी शिवेंद्रराजेंना आंदोलन करावे लागले.

शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करुन टोलनाका बंद पाडला. तसेच लवकरात लवकर प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत, तर पुढील आंदोलन हे खळ्ळखट्याक मार्गाने केले जाईल, असा इशारादेखील शिवेंद्रराजेंनी दिला होता.

आंदोलनाबाबत शिवेंद्रराजे काय म्हणाले? शिवेंद्रराजे यांनी यावेळी एबीपी माझाशी बातचित केली. शिवेंद्रराजे म्हणाले की, आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खड्डेमुक्त झालेले हवे आहेत. महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था हवी. महामार्गावर रुग्णवाहिका आणि टोईंग व्हॅनची व्यवस्था असावी. त्याचबरोबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये करार करताना ज्या काही सोयी सुविधा देण्याचा करार झाला आहे. त्या सर्व सोयी सुविधा प्रवाशांना मिळायला हव्यात. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खळ्ळखट्याक आंदोलन होईल.

व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
NCP Foundation Day : मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2026 | सोमवार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
Embed widget