सांगलीत लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
महिला पोलिस कर्मचारी मुंबई येथे कर्तव्यावर असताना तेथून कोणाचीही परवानगी न घेता भाजीपाल्याच्या गाडीतून विटापर्यंत प्रवास करत तासगावला पोचल्याचे निष्पन्न झाले आहे.
सांगली : लॉकडाऊनच्या काळाच परवानगी शिवाय तासगावमध्ये प्रवेश करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. संबंधित महिला रविवारी रात्री मुंबईहून तासगाव येथे आली होती. याबाबत माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. या महिला पोलिसाला मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. महिला पोलिस कर्मचारी मुंबई येथे कर्तव्यावर असताना तेथून कोणाचीही परवानगी न घेता भाजीपाल्याच्या गाडीतून विटापर्यंत प्रवास करत तासगावला पोचल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून तिला मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर तिच्या नातेवाईकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान तासगाव तालुक्याच्या बाहेरून तासगाव शहर आणि तालुक्यात बेकायदेशीरपणे येणाऱ्या नागरिकांच्या विरोधात तासगाव पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही परवानगीशिवाय आलेल्या सात नागरिकांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे आलेल्या नागरिकांना संस्था क्वॉरंटाईनमध्ये पाठवण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
- PM Modi | 3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
- PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, नफेखोरी करणाऱ्या कंपनीला कोर्टानं फटकारलं