एक्स्प्लोर

Latur : अखेर 45 दिवसांनंतर लातूरला स्वच्छ पाणीपुरवठा सुरू, नागरिकांतून समाधान व्यक्त

गेल्या काही दिवसांपासून लातूरकरांना पिवळसर पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. 

लातूर: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये पिवळसर पाणी पिण्याची वेळ आलेल्या लातूरकरांना अखेर स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला आहे. शहरात मागील 45 दिवसांपासून पिवळसर पाणी पुरवठा होत होता. यामुळे सर्वसामान्य लातूरकरांना याचा त्रास सहन करावा लागत होता. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने अनेक दिवसांच्या प्रयासानंतर पाण्यातील पिवळसर रंग नाहीसा करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. 

लातूर शहराला मागील 45 दिवसापासून पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा केला जात होता. यामुळे लातूरकर मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले होते. वेगवेगळे पक्ष, संघटना यांनी यावर आंदोलनंही केली. मात्र मनपाला पाण्यातील पिवळसर रंग काढून टाकण्यात यश आलं नव्हतं. पाणी तपासणी करण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाने ते पाणी पिण्यालायक आहे अशी खात्री दिल्यानंतरही लातूरकर त्यावर समाधानी नव्हते. आता जलशुद्धीकरण प्रकल्पाची डागडुजी करण्यात आली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवठा केंद्रातील जॅकवेलवरील दारे उघडण्यात आली. त्यानंतर पाणी स्वच्छ स्वरूपात आले आणि मनपाच्या प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. 

लातूर मनपाची मुदत या महिन्यात संपणार आहे. काही महिन्यात मनपाच्या निवडणुका लागणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर शहरात येणारे पिवळे पाणी सत्ताधारी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरले होते. शहरातील विविध भागात रोज पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक भागात 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मागील पाच वेळेस पाणी अशुद्ध आणि पिवळसर आले आहे. मात्र रविवारी पहिल्यांदा प्रयोगिक तत्वावर पाणी सोडून पाहिले असता ते स्वच्छ असल्याचं दिसून आलं. आजपासून शहरात नियमित स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे लातूरकरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

पाणी पिवळे येत होते, यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. आज 17 दिवसानंतर इंडिया नगर, शाम नगर, पंचशील चौक भागात, केशव नगर जाफर नगर, सुळ गल्ली भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget