धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर... : करुणा शर्मा
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? आणि येथील नेते कसे आहेत? अशी टिप्पणी करुणा शर्मा (Karuna Sharma ) यांनी केली आहे.
![धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर... : करुणा शर्मा film should be made on Dhananjay Munde and karuna sharma say karuna sharma धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर... : करुणा शर्मा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/9a23da6619f950af88d1761ff3ba1bc0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karuna Sharma : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सुपर होईल. आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? आणि येथील नेते कसे आहेत? करुणा मुंडेवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगते उभा आहेत, अशी टिप्पणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
करूणा शर्मा यांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या, "कोल्हापूर येथून पोटनिवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला असून 2024 ला परळीतून निवडणूक लढवणार आहे."
"काश्मीर फाईल सिनेमावर मोठे-मोठे नेते बोलत आहेत, ही मुर्खता आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. परंतु, या प्रश्नांवर कोण बोलत नाही. करुणा धनंजय मुंडे यांना पती धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये टाकले, त्यावर कोण बोलत नाही. काश्मीर फाईल्स फक्त चित्रपट आहे आणि तो चित्रपटच राहणार आहे. नेत्यांना बोलायचं असेल तर दिशा सालीयन, पूजा चव्हाण आणि करुणा मुंडेंवर बोला, अशे आवाहन करूणा शर्मा यांनी यावेळी केले.
करूणा शर्मा म्हणाल्या, "धनंजय मुंडे हे पाच- सहा मुलांचे वडील आहे. तरीही ते अजून मंत्री पदावर कसे आहेत? यावर नेत्यांनी बाललं पाहिजे. इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा धनंजय मुंडेंवर बलात्कारचा आरोप झाला आहे, त्यावर बोला."
महत्वाच्या बातम्या
- Beed : 2024 ला नवरा विरुद्ध बायको निवडणूक गाजणार; करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडेंना आव्हान
- Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला
- Beed: धनंजय मुंडे यांचा प्रशासनावर वचक नसल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढून बदनामी होत आहे: भाजप
- तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून ते ईडीपर्यंत जगजाहीर; पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)