एक्स्प्लोर
अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, महादेव जानकर यांची माहिती
संजय दत्त यांच्यासारखी माणसं आम्ही कव्हर करायला लागलो आहोत. फिल्म लाईनमध्ये देखील आम्ही बांधणी केली आहे, असेही जानकर यावेळी म्हणाले. दरम्यान संजय दत्तने देखील एक व्हिडीओ करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यासाठी राज्यभरातून रासप कार्यकर्ते पदाधिकारी आले होते.
यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार आहेत. २५ सप्टेंबर त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली. संजय दत्त यांच्यासारखी माणसं आम्ही कव्हर करायला लागलो आहोत. फिल्म लाईनमध्ये देखील आम्ही बांधणी केली आहे, असेही जानकर यावेळी म्हणाले. दरम्यान संजय दत्तने देखील एक व्हिडीओ करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महादेव जानकर माझे भाऊ आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा, असे संजय दत्तने म्हटले आहे.
जानकर म्हणाले की, सरकारने धनगर समाजाला एक हजार कोटी दिले आहेत. त्याबद्दल एनडीए सरकारचे आभारी आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ओबीसीची अवस्था कडिपत्त्यासारखी होती, असे ते म्हणाले.
धनगर समाजच्या आरक्षणाचे 60 टक्के काम झालं आहे, 40 टक्के बाकी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. विधानसभेसाठी दौंडची जागा आम्हाला देण्यात आली आहे. 14 जागा आम्हाला दिल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल, असेही जानकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement