एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात राष्ट्रवादीच्या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची हाणामारी
पुणे : पुण्यातील बिबवेवाडीमधील रासकर हॉल येथे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये लोखंडी रॉडने हाणामारी झाली. यामध्ये एका कार्यकर्त्याच्या डोक्यात 7 टाके पडले आहेत.
बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार दुसऱ्या हॉलमध्ये ईच्छुकांच्या मुलाखती घेत होते.
प्रेम शेलार आणि रेखा चव्हाण हे दोघेही प्रभाग क्रमांक 18 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी ईच्छूक आहेत. आज मुलाखती सुरु असताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांसाठी बैठक व्यवस्था असलेल्या हॉलमध्ये घुसले. त्यावेळी त्यांच्यात अगोदर बसण्याच्या जागेवर वाद सुरु झाला. त्याचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं.
प्रेम शेलार यांचा भाऊ प्रसाद शेलार आणि त्यांचा सहकारी श्रीकांत शेलार हे मारहाणीत जखमी झाले असून त्यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
ही घटना घडल्यावर काही वेळ ईच्छुकांच्या मुलाखती थांबवण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हॉल, ईच्छुकांना बसण्यासाठी एक हॉल आणि ईच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी एक हॉल, अशा तीन हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जो हॉल होता, तिथे ही घटना घडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement