एक्स्प्लोर

भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला

नागपूर : नागपुरातील तरुणाच्या हत्येप्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बारमधल्या भांडणात मध्ये पडल्यामुळे शुभम महाकाळकर या तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवारी रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजीत खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिजीत खोपडेनं बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अभिजीतनं आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेला आपल्या मदतीसाठी बोलावलं. रोहितसोबत असलेला शुभमही बारमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा भांडणाला तोंड फुटलं. बारमधल्या कर्मचाऱ्यांनी शुभम आणि अभिजीतच्या गाडीची तोडफोड केली. बारमधून बाहेर पडल्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन अर्धा किलोमीटर अंतरावर लक्ष्मीभुवन परसरात गाठलं. तिथेच त्याची भोसकून हत्या केल्याचा आरोप शुभमच्या परिवाराने केला आहे. या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शुभमला या प्रकरणात जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकरणी बार मालक सनी बामब्रतवार याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पबमधील किरकोळ वादानंतर नागपुरात युवकाची हत्या

बारमध्ये धुडगूस घातल्या प्रकरणी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्यात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांचं नाव आहे. अभिजीत खोपडे, रोहित खोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. तोडफोड करणे आणि बार मालकाला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. बारमधील तोडफोडी आणि मारामारीनंतर अर्धा किमी अंतरावर झालेल्या शुभम महाकाळकरच्या हत्या प्रकरणात बार मालक सनी बामब्रतवार आणि इतर 7 ते 8 जणांविरोधात हत्येचा (कलम 302) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम महाकाळकर हा राष्ट्रीय पातळीवर लेझिमचा खेळाडू होता. 26 जानेवरीला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात गेले तीन वर्ष तो सहभागी होत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेशSambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Embed widget