एक्स्प्लोर
Advertisement
दोन बायका फजिती ऐका, आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात हाणामारी
राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा इथल्या वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या.
यवतमाळ : यवतमाळमधील आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भररस्त्यात कडाक्याचं भांडण झालं. 12 फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास त्यांच्यात वादावादी झाली. मग त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं.
राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा इथल्या वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. मात्र पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत असल्याच्या कारणावरुन दोघींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. पुढे हे प्रकरण पोलिसात गेलं. पण पुढे काय कारवाई झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
पहिली पत्नी असूनही राजू तोडसाम हे गेल्या काही वर्षांपासून प्रिया नावाच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत. तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरा विवाह करुन तिच्याशी संसार थाटला. प्रिया या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे एकत्र सहभागी होत असत. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या घडामोडींमुळे त्यांची पहिली पत्नी त्रस्त होती.
या विषयावरुन काल दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हाणामारी झाल्याची माहिती आहे. पहिली पत्नी नातेवाईकांसह कार्यक्रम ठिकाणी धडकली आणि मग दोघींमध्ये हाणामारी झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
क्रीडा
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement