एक्स्प्लोर
Advertisement
ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे न आणल्याने विवाहितेला जाळलं
बीडः पती-पत्नीच्या टोकाला गेलेल्या वादानंतर रितसर फारकत घेण्यासाठी पंचायतीची बैठक बोलावली. परंतु त्यातही निवाडा न झाल्यामुळे विवाहितेला जाळून विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई तालुक्यातील उमापूर येथे उघडकीस आला घडला आहे.
संगीता उर्फ लक्ष्मी एकनाथ कुऱ्हाडे असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी संगीताचा विवाह झाला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे न आणल्याने कृत्य
उमापूर हे संगीता यांचे आजोळ असून तेथे सोमवारी पंचायतीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी संगीता आपल्या आई- वडिलांसमवेत उमापूर येथे आजोबा शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे आल्या. तेथे तिचा पती एकनाथ कुऱ्हाडे, सासरा चंद्रभान कुऱ्हाडे, सासू फुलाबाई कुऱ्हाडे हे देखील उपस्थित होते.
शंकर कुऱ्हाडे यांच्या घरी दोन्हीकडील नातेवाईक आल्यानंतर बैठक सुरु झाली. संगीता नांदण्यास तयार नव्हती. फारकतीनंतर सासरच्यांनी संगीताची दीड लाख रुपये देऊन ओटी भरावी या मागणीवर तिचे वडील धोंडीराम रखवले आडून बसले होते. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. पंचायतीत शेवटपर्यंत निवाडा न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली.
सायंकाळी सारेच शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे मुक्कामी होते. मध्यरात्रीनंतर सासरच्या मंडळींनी संगीताला घराच्या बाजूला नेत तिच्या अंगावर रॉकेल ओतले ओतून जाळले आणि मृतदेह सार्वजनिक विहिरीत फेकला.
आरोपींना पोलिस कोठडी
धोंडीराम रखवले यांच्या फिर्यादीवरुन चंकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर कुऱ्हाडे हा संगीता यांचा आजोबा होता. तसेच तो नात्याने तिचा पती एकनाथ याचा मामाही होता. त्याच्या घरी घटना झाल्याने त्यालाही आरोपी केले आहे. चारही आरोपींना मंगळवारी गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement