एक्स्प्लोर
'माझे पप्पा' चौथीत शिकणाऱ्या मंगेशचा हृदय हेलावून टाकणारा निबंध व्हायरल
महिन्याभरापूर्वी वडिलांचे टीबीमुळे निधन झाले आणि लहान वयातच मंगेश पोरका झाला. मंगेशने त्याच्या संवेदना निबंधाद्वारे वहिच्या पानावर उमटवल्या आहेत. हा निबंध वाचताना वाचणाऱ्याच्या काळजालाही जखमा होतात.
बीड : कोवळ्या वयातच वडिलांची साथ सुटली, हट्ट पुरवणारा बाप काळाने हिराऊन नेला आणि अशातच वर्गात निबंधाचा विषय आला माझे वडील. त्यानंतर 10 वर्षांच्या मंगेशने लिहलेला निबंध वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्याचा हा निबंध व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे.
मंगेश वाळके हा 10 वर्षांचा मुलगा बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथी इयत्तेत शिकत आहे. गेल्या महिन्यात (18 डिसेंबर 2019) मंगेशच्या वडिलांचे क्षयरोगामुळे (टीबी) निधन झाले. या धक्क्यातून मंगेशचं कुटुंब अजूनही सावरलेलं नाही. याचदरम्यान एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माझे वडील या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले. त्यानंतर मंगेशने लिहलेला हा निबंध सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
वडिलांचे टीबीमुळे निधन झाले आणि लहान वयातच मंगेश पोरका झाला. मंगेशने त्याच्या संवेदना निबंधाद्वारे वहिच्या पानावर उमटवल्या आहेत. हा निबंध वाचताना वाचणाऱ्याच्या काळजालाही जखमा होतात. मंगेशची आई अपंग आहे. मंगेशचे वडील परमेश्वर वाळके हेच या दोघांचे आधार होते. ते आज या जगात नाहीत, परंतु मंगेशने आपल्या वडिलांची कमतरता या निबंधातून माडली आहे.
निबंध : माझे पप्पा
माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टिबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीने माला मामाच्या गावाला पाठविले होते. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. माला खाऊ आणायचे, वही, पेन आणायचे, माझा लाड करत होते. माला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18 डिसेंबेर ला वारले. माझी मम्मी खूप रडली, मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून मी आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते, पप्पा तुम्ही लवकर परत या...
मंगेशचा निबंध
स्कूलबसमध्ये शिरत तिघांकडून गतिमंद मुलीचा विनयभंग, औरंगाबादमधील संतापजनक घटना | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement