एक्स्प्लोर

मोठी बातमी! 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Pik Vima) देय असलेले 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dhananjay Munde on Pik Vima : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Pik Vima) देय असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा

काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना  होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व  इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन  त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.

 पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते. याबाबतची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला. तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .

कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना फायदा

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीपोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते. त्याच्या वाटपाची कारवाई सुरु आहे. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आ. हिरामण खोसकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.दिलीपराव बनकर, आ.सरोजताई अहिरे, आ.नितीन पवार, आ.सुहास कांदे, माजी आमदार जयंत जाधव आदींनी पीक विम्याच्या संदर्भात आपल्याकडे विषय उपस्थित केले होते असे मुंडे म्हणाले. या सर्वांसह लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

Akola News : अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल; ठाकरेंच्या आमदाराने नगरपालिकेत तहसीलदारांना कोंडल्यानंतर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget