एक्स्प्लोर

… अन्यथा शेतकऱ्यांबाबत अहवाल देणाऱ्या सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा; शिरसाट यांची मागणी

Sanjay Shirsat : हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले आहे.   

Sanjay Shirsat On Sunil Kendrekar reports : शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला असून, या आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचा एक सर्वेक्षण केला होता. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु असल्याचा अहवाल सरकार देण्यात आला आहे. दरम्यान हा 'खळबळजनक अहवाल' एबीपी माझाने दाखवताच याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत असून, या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले आहे.   

काय म्हणाले शिरसाट...

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर यांनी काढला आहे. त्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यावरून संताप डोक्यात गेलेला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा रिपोर्ट असेल शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्याकडे कालच याबाबत मागणी केलेली आहे. तर विभागीय आयुक्त म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का?, नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी उभा कसा राहील, याकडे लक्ष द्या, शेतकरी आत्महत्या कसे करतात याकडे तुमचे लक्ष आहे का? असे शिरसाट म्हणाले. तर तुमची राजकीय व्यक्तींसारखा स्टेटमेंट आणि अहवाल देतायत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. जर अहवाल चुकीचा असेल तर निश्चित गुन्हा दाखल केला जाईल. सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात ईडीची चौकशी चालू असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 

काय केंद्रेकरांचा अहवाल? 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबाची माहिती भरुन घेण्यात आली होती. सर्वेक्षण करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

धक्कादायक! मराठवाड्यातील 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात; खळबळजनक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Embed widget