एक्स्प्लोर

मुंबईकरांची विज बिलं ‘लाईट’, शेतकऱ्यांना मात्र ‘शॉक’

मुंबईतल्या टाटा, अदानी आणि बेस्टच्या दरांमध्ये किरकोळ घट करण्यात आली आहे. तर महावितरणच्या दरांमध्ये मात्र 3 ते 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांसमोर वीज दरवाढीचं विघ्न उभं राहिलं आहे. कारण राज्य वीज नियामक आयोगाने शेतकऱ्यांच्या विजेच्या दरात प्रति यूनिट 20 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांवर 600 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचा दावा केला जातो आहे. दुसरीकडे, मुंबईतल्या विजेचे दर मात्र कमी करण्यात आले आहेत. मुंबईतल्या टाटा, अदानी आणि बेस्टच्या दरांमध्ये किरकोळ घट करण्यात आली आहे. तर महावितरणच्या दरांमध्ये मात्र 3 ते 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विजेचा उत्पादन खर्च वाढूनही विजेच्या दरात फारशी वाढ केली नसल्याचा दावा आज राज्य वीज नियामक मंडळाने केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत विज नियामक मंडळाने मुंबई आणि महाराष्ट्रातले नवे दर निश्चित केले आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन 2018 -2020 या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर 1 सप्टेंबर 2018 पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हायटेन्शन वीज वितरणातील मोठे औद्योगिक ग्राहकांसाठीचे दर  टाटा पॉवर जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 12 पैसे नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 38 पैसे अदानी इलेक्ट्रिसिटी जुने दर (प्रती युनिट) - 10 रु. 07 पैसे नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पैसे बेस्ट जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 65 पैसे नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 06 पैसे महावितरण जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 04 पैसे नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 20 पैसे उच्च दाब वितरण (वाणिज्यिक वापर) टाटा पॉवर जुने दर (प्रती युनिट) - 9 रु.71 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 90 पै. अदानी जुने दर (प्रती युनिट) - 10 रु. 76 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 10 रु. 05 पै. बेस्ट जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 17 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 56 पै. महावितरण जुने दर (प्रती युनिट) - 13 रु. 47 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 13 रु. 80 पै. लघुदाब वितरण (छोट्या उद्योगांसाठी) टाटा पॉवर जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 34 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 19 पै. अदानी जुने दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 9 रु. 37 पै. बेस्ट जुने दर (प्रती युनिट) - 8 रु. 43 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 7 रु. 52 पै. महावितरण जुने दर (प्रती युनिट) - 7 रु. 83 पै. नवीन दर (प्रती युनिट) - 8 रु. 25 पै. इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज वापरामध्ये अनुदानित दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रती युनिट 6 रुपये दर ठरविण्यात आला असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) 70 रुपये प्रती केव्हीए/महिना असा ठरविण्यात असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. गतिशील पद्धतीने प्रकरणांची सुनावणी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नवीन सदस्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोगासमोर येणाऱ्या प्रकरणांवरील सुनावण्या वेगाने करण्यावर भर दिला आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत 160 प्रकरणांवर आयोगाने निर्णय दिला असून प्रती महिन्याला 13 प्रकरणे निकाली काढली आहेत. तर 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 17 या प्रमाणे 204 प्रकरणे निकाली काढली आहेत. तर 1 एप्रिल 2018 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत प्रती महिन्याला 33 या प्रमाणे 165 प्रकरणे निकाली काढली आहेत. पुढील काळात प्रत्येक महिन्याला 40 पेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. एका याचिकेवर 120 दिवसात निकाल देणे अपेक्षित असताना या मंडळाच्या सदस्यांनी सातत्याने कामे करून 27 दिवसात प्रकरणे निकाली काढून 18 दर पत्रके मंजूर केली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या

Embed widget