maharashtra cabinet : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीत, पक्षश्रेष्ठींशीसोबत खलबतं
Devendra Fadnavis Visit Delhi : राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे.
Devendra Fadnavis Visit Delhi : राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी होणार असल्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे याची चर्चा अधिक रंगली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपच्या पक्षश्रेष्ठींशीसोबत राज्यातील विविध विषयावर चर्चा करणार आहेत. यामध्ये रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्टातील याचिका याचा समावेश असेल. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द (Meeting) करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटे पर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, सहा तारखेला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. तर सात तारखेला निती आयोगाची बैठक आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचं आहे. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावतीनेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत देण्यात आले आहेत.