एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Eknath Shinde : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा निर्णय उद्या कॅबिनेटमध्ये घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. दोनशे तिनशे निर्णय घेतले ही कॅबिनेट बेकायदेशीर होती.उद्या कॅबिनेट घेऊन नामांतराच्या शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 मुंबई : ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयाला उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार अल्पमतात असताना  ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णय घेतला. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले  निर्णय बेकायदेशीर असतात. आम्ही उद्या सकाळी कॅबिनेट घेऊन  संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला शिक्कामोर्तब करणार आहोत.

शिवसेनेला आणि शिवसैनिकांनी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला

शिवसेनेला आणि शिवसैनिकांनी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पुण्याच्या रस्त्यावर पंढरपूरला जाताना माझं स्वागत करत होते. लोकांच्या भावना बघितल्या त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे  सगळं करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही  तर पन्नास लोक माझ्यामागे आहे.  मला म्हणे मुख्यमंत्री करतो, पण मी मुख्यमंत्री पदासाठी आलोच नाही.  आपला पक्ष मोठं करण्यासाठी आपल्या माणसाचा ऐकलं पाहिजे म्हणून मी आलो आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना तुम्ही हलका समजला का?

एकनाथ शिंदे म्हणाले,  आम्ही संयम बाळगत होतो, इकडे चर्चा करायची आणि तिकडे पदावरून काढायचे. माझ्या घरावर दगडफेक करण्यास सांगितले पण वेळ आली तेव्हा सगळे मागे आले. एकनाथ शिंदेंना तुम्ही हलका समजला का? लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते. एकीकडे चर्चा करायला पाठवायचं आणि दुसरीकडे कारवाई करायची. मधमाशासारख पोळ माझ्याबाजूने आहे.

 मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे

पेट्रोल डिझेलचे दर आम्ही कमी केले कारण हे सर्वसामान्यचा सरकार आहे. हा मुख्यमंत्री माझा आहे असं वाटलं पाहिजे. लोक म्हणताय मंत्रालय सुरू नाही, 'अरे मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे, जिथे जातो तिथे माझं काम सुरू असते, काम सुरूच आहे. ज्यांना चर्चा करण्याच्या आहेत त्या करू द्या. सकळी 7 पासून पूरस्थितीचा आढावा घेत असतो.

औरंगाबाद नामांतरला स्थगिती  नाही : देवेंद्र फडणवीस

ठाकरे  कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद नामांतरला कोणतीही स्थगिती दिली नाही.  ठाकरे सरकरने हा निर्णय घेतला होता त्याच्या आधी राज्यपाल यांनी पत्र दिले होते असे करता येत नाही. बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणताही निर्णय घ्यायचा नसतो. अडीच वर्ष त्यांनी या विषयाला हात लावला नाही बहुमत गमावल्यानंतर निर्णय घेतला. पुढील कॅबिनेटला हा निर्णय आम्ही घेणार आहोत. हे तीनही निर्णय आम्ही घेणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Embed widget