मोठी बातमी : शिंदे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी आजच जाहीर होणार, एकनाथ शिंदेंच्या घोषणेकडे लक्ष
Eknath Shinde Shiv Sena Candidate List : कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Eknath Shinde Shiv Sena Candidate List : शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आठ उमेदवारांची पहिली यादी यापूर्वी जाहीर केली असून, उरलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार असल्याची माहिती संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे. त्यामुळे कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "उद्या दुसऱ्या टप्प्याची अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. राहिलेल्या नावांची घोषणा आज करण्यात येईल. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे, कुणी नाराज होऊ नये म्हणून सामावून घेऊन नंतरच घोषणा करणार आहे. कोकणची जागा आम्हाला हवी असून, आग्रह आहेच. मात्र, नारायण राणे आमचे शत्रू नाही, याबाबत दोन्हीं पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. आज दुपारपर्यंत निर्णय होईल असे शिरसाट म्हणाले.
बच्चू कडू यांच्या वक्तव्याला महत्व
मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातून आहे, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले आहे. मोदी साहेब, शाह साहेब त्यांना मदत करतात. काही लोक जे काही बोलतात त्यात शिंदे साहेब समंजस भूमिका घेताय. आम्हाला भाजप दाबतेय का, आमचा बळी घेणार का? या सगळ्या चर्चा दुर्दैवी आहे. बच्चू कडू साहेबांनी भावना व्यक्त केल्या असाव्यात, मात्र असे काही घडणार नाही. त्यांच्या वक्तव्याला महत्व निश्चित आहे, मात्र ती त्यांची भावना असेल, असे शिरसाट म्हणाले.
आगीतील मयताच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत...
आज सकाळी संभाजीनगरात लागलेली आग दुर्दैवी आहे, मृताच्या नातेवाईकांना सरकार मदत करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही मयताच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख सरकारकडून देणार आहोत, असेही शिरसाट म्हणाले.
ठाकरेंचे सगळे आमदार आमच्या संपर्कात
ठाकरे गटाचे माझे कुटुंब माझी जबाबदारी सोडून सगळे आमदार आमच्या संपर्कात आहे. शिंदे साहेब विचार करून निर्णय घेत आहेत. आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवबंधान बांधतो, तिकडच्या सारखे गंडा दोरे बांधत नाही. आम्ही बांधत होतो ते शिवबंधन आता गंडेदोरे झाले असल्याचे शिरसाट म्हणाले.
ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर...
एकीकडे शिंदे गटाकडून आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार असतानाच, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यात कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी आणि जळगाव लोकसभेतून कर्ण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :