(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : आमच्या कुठल्याही अटी नाहीत, सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड नाही : एकनाथ शिंदे
Maharashtra Shiv Sena Eknath Shinde News : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याशी एबीपी न्यूजनं संवाद साधला.
Maharashtra Shiv Sena MLA Latest Updates : सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याशी एबीपी न्यूजनं संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आमच्यासोबत 46 आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत. हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत, असंही ते म्हणाले.
आमदार नितीन देशमुखांच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, हा खोटा आरोप आहे. आम्ही त्यांना जबरदस्ती ठेवलं असतं तर आमचे लोकं त्यांना सोडण्यासाठी गेले असते का? असा सवाल त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, हिंदुत्व आमच्यासाठी महत्वाचं आहे. माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड कधीच करणार नाही, असं ते म्हणाले. शिंदे यांनी सांगितलं की, आमच्यासोबत 46 आमदार आहेत. या शिवसेनेसह इतरही आमदार आहेत. हा आकडा अजून वाढणार आहे. आमच्या कुठल्याही अटी नाहीत.
एकनाथ शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. आमची सर्व आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक संख्याबळ असल्याचेही ते म्हणाले.
आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही
एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी बोलताना म्हटलं होतं की, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या
शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35...
महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?