एक्स्प्लोर

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोदींना दोन तास युद्ध थांबवलं होतं: एकनाथ शिंदे 

Vidhansabha Monsoon Session : गरीबी हटवा म्हणणाऱ्या काँग्रेसने गरिबी हटवली का? पण नरेंद्र मोदींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकच व्यक्ती भारी आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukrain War) सुरू असताना भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोदींनी दोन तास युद्ध थांबवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Narendra Modi) म्हणाले. शिवरायांची वाघनखं आम्ही याच महिन्यात भारतात आणू आणि त्याचा योग्य वापरही करू अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, रशियाने ज्यावेळी युक्रेनवर हल्ला केला होता त्यावेळी त्या ठिकाणी अनेक भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यावेळी इथल्या पालकांनी नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती केली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दोन तास युद्ध थांबवलं होतं. 

वाघनखांचा योग्य वापर करू

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भारतात आणण्यात येणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांवरून सरकारला टोला लगावला होता. शिवरायांची वाघनखं भारतात आणणार असं गेल्या दोन अधिवेशनापासून आम्ही ऐकतोय असं जयंत पाटील म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवरायांची वाघनखं ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, याच महिन्यात भारतात आणण्यात येतील आणि त्याचा आम्ही योग्य वापर करू. लोकांमध्ये उर्जा येण्यासाठी ते सर्वसामान्यांना दाखवण्यात येतील.

गरीबी हटवा म्हणणाऱ्या काँग्रेसने गरिबी हटवली का? पण नरेंद्र मोदींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

काय म्हणाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकार पडेल असं सातत्याने बोललं गेलं, पण आता सरकारला 2 वर्षे झाली. सरकार पडलं नाही पण अनेकांचे चेहरे पडले. त्यांच्या लोकसभेला 31 जागा आल्या पण आता विधानसभेत बघू. फेक नरेटिव्हने पुन्हा पुन्हा जिंकता येत नाही. जनमत पायदळी तुडवून तेव्हा सरकार बनलं, त्याला विरोध करून आम्ही सरकार बनवलं आणि राज्यात महायुती सरकार आलं. आम्ही जनतेचा विश्वास प्राप्त केला. विचार विकास आणि विश्वास ही आमची त्रिसूत्री आहे. या काळात 575 निर्णय आम्ही घेतले. या काळात अनेक वेताळ आडवे आले, पण विकासाचा विक्रम आम्ही केला. आम्ही घरात न बसता सरकार जनतेच्या दारात नेलं. 

विरोधकांना जबाबदारीचे भान आहे का नाही? विरोधक आता सभागृहात देखील शिव्या देऊ लागले आहेत. वरच्या सभागृहात झालेला प्रकार दुर्दैवी आहे. विरोधक म्हणून काम करायची सवय लावा, तिकडेच काम करायचं आहे. फेक नरेटिव्हसमोर आम्ही कमी पडलो. तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देऊ. तुम्ही केलेली दिशाभूल लवकरच उतरेल. 

अजितदादा पवारांनी त्यांच्या अर्थसंकल्पात अनेक लोकोपयोगी योजना आणल्या. विरोधकांच्या पोटात का दुखतं कळत नाही. कौतुक करता येत नसेल तर टीका करत जाऊ नका. महायुतीच्या भावंडांकडून आपल्या बहिणींना माहेरचा आहेर देण्यात आला आहे. आमच्या भगिनींकडून कुणी या कामासाठी पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकू. महिलांचा सन्मान करणे महाराष्ट्राची संस्कृती आहे. 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना काय समजणार?

ज्या घरातील लक्ष्मी सुखी, त्या घरात समृद्धी पक्की. वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार. सभागृहात काही फोटोग्राफर देखील आहेत, त्यांनी एरियल फोटो सोडून जमिनीवरील देखील फोटो काढले पाहिजेत.

मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना अनुदान देण्याचा निर्णय केला आहे. कोविड काळात आयपीएल सुरू होतं, पण हिंदू सण उत्सव बंद होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच होत नव्हतं, म्हणून तिकडून एक आला आणि दुसराही आला. ⁠

लेक लाडका आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी हा काहींचा अजेंडा होता. मला बजेटमधलं कळत नाही असं म्हणणारे देखील मुख्यमंत्री राज्याने पाहिलेत. मविआच्या तुलनेत महायुतीने शेतकऱ्यांसाठी अनेक पटींनी निर्णय घेतले. सीबीलची अट टाकून मदतीला अडथळा आणला तर बँकांवर एफआयआर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार उपयुक्त होती, पण नंतर त्याची चौकशी सुरू केली. त्यात मिळालं काय? खोदा पहाड निकला चुहा.  

जयंतराव अर्थमंत्री असतानाही आपलं स्थान तिथंच होतं. किमान तुम्ही तरी खरं बोलाल असं वाटलं होतं, पण तुम्हालाही मित्राचा गुण लागला

दीपक केसरकर जर्मनीत गेले तीथे 4 लाख मुलांना रोजगार देण्याचा त्यांनी एमयू केला आहे. ⁠जयंतराव मी जे आकडे बोलते ते बरोबर आहेत, जर खोटे असेल तर मी काहीही भोगायला तयार आहे. ⁠विरोधकांना एकच माझं सांगण आहे की 'उघडा डोळे बघा नीट' आणि वागा नीट. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget