एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; जावई गिरीश चौधरींना अटक

Bhosari Land Scam : सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीनं मोठा दणका दिला आहे. भोसली भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे.

मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. काल (मंगळवारी) गिरीश चौधरी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशीरापर्यंत ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशी अंति ईडीकडून त्यांच्यावर रात्री उशीरा अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे. 

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही ईडीने नोटीस धाडली होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. खडसेंनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार केला होता. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आणि एकनाथ खडसेंच्या पदरी महसूल खातं आलं. त्यानंतर 28 एप्रिल 2016 मध्ये खडसेंचा याच भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे जमीन व्यवहार झाला. पण तत्पूर्वीच इथं अनेक कंपन्याचं काम सुरु होतं. मग हा व्यवहार कसा काय झाला? असा प्रश्न 30 मे 2016 साली तक्रारदार हेमंत गावंडेनी उपस्थित केला होता आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले होते. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही सामाजिक संघटनांनी याप्रकरणी एकनाथ खडसेंना चांगलंच घेरलं. परिणामी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 4 जून 2016 ला एकनाथ खडसेंनी सर्व मंत्री पदाचा राजीनामा दिला. खडसेंकडे त्यावेळी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री अशी खाती होती. खडसेंनी राजीनामा देताच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायमूर्ती झोटिंग यांची एक सदस्यीय समितीची स्थापना केली.

झोटिंग समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करणं अपेक्षित होतं. फेब्रुवारी 2017मध्ये नागपूरला जाऊन खडसे या समितीसमोर हजरही झाले. मात्र तरीही अहवाल सादर होण्यात सातत्याने चालढकल सुरूच होती. शेवटी उच्च न्यायालयाने फटकारले आणि एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरावे आढळून येत नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान 2019 मध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपच्या हातून सत्ता जाण्याला आणि पक्षात माझी मुस्कटदाबी करण्याला एकमेव फडणवीस जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत खडसेंनी कमळ सोडून हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतलं. या प्रवेशाला दोन महिने उलटताच खडसेंना ईडीने नोटीस धाडली होती. आता याचप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. 

राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

भाजप सोडून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले, तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझाEknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Embed widget