एक्स्प्लोर
आधीच कोरोनाची दहशत त्यात भूकंपाचे धक्के, पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला
कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललं असताना पालघरमध्ये भूकंपाचं सत्र पुन्हा चालू झालं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि परिसरात आजवर अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. बुधवारी रात्री पुन्हा पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील बहुतांश भाग सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत असताना भूकंपाच्या धक्क्यांनी पालघरकरांचा पिच्छा अजूनही सोडलेला नाही. बुधवारी रात्री 11 वाजून 19 आणि 11 वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. हे धक्के तलासरी, धुंदलवाडी, आंबोली, आशागड, कासा, बोर्डी, बोईसर या भागात जाणवले. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीपोटी भूकंप प्रवनक्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी बाहेर स्थलांतरित झाले होते. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट असल्याने या भागातील सर्व नागरिक पुन्हा आपल्या गावात परतलेले आहेत. त्यातच हे काही काळ शमलेले संकट पुन्हा डोकं वर काढायला लागल्यामुळे येथील नागरिकांच्या मनात ह्या दुहेरी संकटामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे. सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातत्याने एकापाठोपाठ होणाऱ्या भूकंपांनी नागरिकांच्या मनात भीतीचे काहूर उठवले आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत, तर काही भिंती दुभंगण्याच्या स्थितीत आहेत. अशा जमिनी हादरवून सोडणाऱ्या भूकंपाने डोक्यावरील छत आणि घर कोसळले तर कुठे जायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भूकंपाने स्थानिक नागरिक पुरते हैराण झाले आहेत. भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल 2019 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल 1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल 7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल 13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल 20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल 1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल 9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल 10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल 31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल 2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल 9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल 15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल 12 मे - 2.6 रिश्टर स्केल 10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल 20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल 24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल 25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल 31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल 13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल 21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल 20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल 21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल 2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल 24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल 26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल 18 नव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल 21 नव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल आतापर्यंत भूकंपाचे एकूण 54 धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा
























