एक्स्प्लोर

द्वारकदास मंत्री बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल; प्रकरण नेमकं काय?

Dwarkadas Mantri Bank Fraud Case : द्वारकदास मंत्री बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर बँकेमध्ये 229 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं बोललं जात आहे.

Dwarkadas Mantri Bank Fraud Case : बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेमध्ये 229 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह आता पंचवीस हजारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने फेब्रुवारी 2021 मध्ये  द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या आंतरशाखीय समायोजन व्यवहाराची विशेष तपासणी केली होती. यात बँकेतील नियमांचे उल्लंघन झाल्यानं दोषी असलेल्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठीचा अहवाल सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याच अनुषंगानं सहकार आयुक्तांनी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुभाष सारडा यांचे पुत्र आदित्य सारडा हे पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती आहेत. आदित्य सारडा हे बीड जिल्हा बँकेचे मागची पाच वर्ष अध्यक्ष होते. बँकेमध्ये झालेला गैरव्यवहार प्रशासकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासक मंडळाचे सदस्य बीबी चाळक यांच्या फिर्यादीवरून  229 कोटी 5 लाख रुपयाचा अपहार झाल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुभाष सारडा यांच्यासह 25 जनावर आता या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेशी संबंधित वाद थांबायला तयार नाही. काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, द्वारकादास मंत्री बँकेवर राज्य सरकारने प्रशासक नेमला होता. त्याचवेळी संचालक मंडळाच्या काळातील काही व्यवहार चुकीचे असल्याचा ठपका ठेवत प्रशासकांनी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. काही कर्ज वाटपामध्ये बँकेच्या सहसंचालक मंडळाने नियमांचे पालन न केल्याचा ठपका आहे. मात्र मागच्या काही काळात ही प्रक्रिया थंडावली होती. त्यानंतर सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यावर उच्च न्यायालयाने थेट बीडच्या पोलीस अधिक्षकांनाच शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तिथपासून मात्र या प्रकरणात वेगानं चक्रं फिरताना दिसून आली. शनिवारी सकाळी याप्रकरणात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. यात सायंकाळी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला यापूर्वीच बडतर्फ करण्यात आलेले आहे. तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेशाम सोहनी यांना प्रशासकांनी निलंबित केलेलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget