26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची घोषणा
Pankaja Munde : राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांची गोंदियात सभा तर पंकजा मुंडेंची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
Pankaja Munde : राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे सर्व बडे नेते निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. भाजप नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. देवेंद्र फडणवीसांची गोंदियात सभा तर पंकजा मुंडेंची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बीडमधील आष्टीत पंकज मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात होऊ घातलेली नगरपंचायतीची निवडणुक काळी निवडणूक असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर 26 जानेवारीपासून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
आष्टी येथील सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल चा इम्पीरियल डाटा या सरकारने दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून मी याच अनुषंगाने महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, एवढेच नाही तर मराठा आरक्षणाबद्दल देखील डाटा राज्य सरकारने केंद्राकडे दिला पाहिजे. आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर भाजप आमदार सुरेश धस आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेला मोठा जणसमुदाय उपस्थित होता.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स ही शिकण्याची गोष्ट आहे, असं वक्तव्य यावेळी पंकजा मुंडे यांनी केला आहे. सुरेश धस आणि भीमराव धोंडे हे दोघे फडणवीस यांच्याकडे गेले होते, आणि 50 टक्के जागा मागितल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं एकूण घेतलं, मी ही त्यांच्याकडून पेशन्स शिकले आहे. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live