पोलिसांनी जप्त केले शेतकऱ्यांचे 4 लाख, बुलढाण्यात नाकाबंदीदरम्यान घडला प्रकार, शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
नाकाबंदी दरम्यान शेतकऱ्याचे (Farmers) 4 लाख रुपये पोलिसांनी (Police) केले जप्त केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडली आहे.
Buldhana Farmers News : नाकाबंदी दरम्यान शेतकऱ्याचे (Farmers) 4 लाख रुपये पोलिसांनी (Police) केले जप्त केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी शेतकरी आक्रमक झाले असून, रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. तर दुसरीकडे अडत्यांनी देखील बाजार समितीतील खरेदी विक्री बंद केली आहे.
रास्ता रोको केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा
दरम्यान, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या चक्का जाममुळं प्रवासी त्रस्त आहेत. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना अडत्याने 4 लाख रुपये दिले होते. हे पैसे पोलिसांनी निवडणूक अनुषंगाने सुरू असलेल्या नाकाबंदीत पकडले आहेत. त्यामुळं मलकापूर जवळील बेलाड गावाजवळ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चक्का जाम सुरू केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणला आहे. त्यांना पैसे देण्यासाठी कल्याणी ट्रेडर्सच्या मालकाने एक्सीस बँकेतून 4 लाख रुपये बाजार समितीमध्ये घेऊन जात असताना मलकापूर पोलिसांनी ती रोख रक्कम जप्त केली आहे. त्यामुळं अडत व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी बंद केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलीस कारवाई विरोधात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रोखून धरला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या चक्काजाममुळं वाहनातील प्रवासी त्रस्त झाले आहेत. सुमारे 2 तासापासून शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरल्याने वाहनधारक हैरान झाले आहेत.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. या काळात सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात पैशांचा कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात येत आहे. ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी या काळात वाहनांमध्ये कोट्यावधी रुपये सापडल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात देखील एका वाहनात पोलिसांना 4 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. मात्र, ही रक्कम शेतकऱ्या्ंची होती. यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.