(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahaparinirvan Din :'संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं', महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून राज्यपालांनी जनतेला केले संबोधित
Governor From Chaitya bhoomi : आज डॉ. बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत.
Governor From Chaitya bhoomi On Mahaparinirvan Din : आज डॉ. बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan din) चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले.
'संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं' - राज्यपाल
डॉ. बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे. बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं असं सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले, डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलोय आणि चालत राहू असं राज्यपालांनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय.
'बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त' - देवेंद्र फडणवीस
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे. बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
बेस्टकडून अतिरिक्त बसची व्यवस्था
बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या अनुयायांसाठी आज विविध प्रकारच्या सेवा देण्यात आहेत. मोठ्या संख्येने समाजातील दुर्बल घटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांसाठी बेस्टने स्वस्त आणि चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. तसेच 400 जादा दिव्यांची आणि 50 जादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध केली आहे.
प्रथमोपचार व अल्पोपहार पुरवण्याची व्यवस्था
स्मारकाला रोषणाई केली असून अखंड वीज पुरवठ्यासाठी जनरेटर्सची देखील व्यवस्था केली आहे. तोट्याची पर्वा न करता आधुनिक व्यवस्थेद्वारे जगातील सर्वात स्वस्त आणि चांगली वाहतूक सेवा बेस्ट कडून सामाजिक बांधिलकी म्हणून देण्यात येते. दैनंदिन बसपासद्वारे भाविक प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन हो हो सेवेद्वारे घेऊ शकतील. त्याचबरोबर बेस्टने प्रथमोपचार व अल्पोपहार देखील पुरवण्याची व्यवस्था केली आहे.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलीस, एसआरपीएफ, बॉम्बशोधक पथक आणि इतर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या