(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli Railway Station: धक्कादायक घटना! एमएसएफच्या जवानांमुळं वाचले महिलेचे प्राण; थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद
Dombivli Railway Station: रेल्वेतून प्रवास करताना हलगर्जीपणामुळं अनेक प्रवाशांना स्वत:चा जीव गमवला लागलाय.
Dombivli Railway Station: धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु. गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. दरम्यान, डोंबिवली रेल्वे स्थानकावरील अशीच एक घटना धक्कादायक घटना घडलीय. धावती लोकल पकडण्यासाठी धडपड करणाऱ्या एका महिला प्रवाशांचा तोल गेल्यानं ती खाली कोसळली. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एमएमएफच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन या महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. दरम्यान, सीएसटीकडे जाणारी एक लोकल ट्रेन स्थानकावर थांबल्यानंतर त्यात सर्व प्रवासी चढले. मात्र, त्यानंतर लोकल सुरु झाली. त्यावेळी धावती लोकल पकडण्यासाठी आलेली संबंधित महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु, तिचा तोल गेल्यानं ती रेल्वे फलाटावर पडली. पण तिथे उभ्या असलेल्या एमएसएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला मागे ओढलं. ज्यामुळं तिचे प्राण वाचले आहेत.
एएनआयचं ट्वीट-
रेल्वेतून प्रवास करताना हलगर्जीपणामुळं अनेक प्रवाशांना स्वत:चा जीव गमवला लागलाय. यात पुरुष, महिला यांच्यासह तरूणांचाही समावेश आहे. यातील काही तरूणांचा स्टंटबाजी करण्याचा नादात मृत्यू झालाय. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जाते. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोरोना काळात रेल्वे अपघातात मोठी घट झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारच्या अनेक घटना घडत आहेत.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- मुंगुसाच्या तावडीतून वाचण्यासाठी पळाला पण विजांच्या तारांवर अडकला, जीव धोक्यात घालून सर्पमित्राने वाचवले नागाचे प्राण
- Mesma Act: संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यान्वये कारवाई होणार; एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा
- Ashish Shelar : महाराष्ट्रात "गब्बर"सारखा कारभार सुरु, शेलारची राज्य सरकारवर टीका