(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद
Dombivli Thakurli Bridge : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद राहणार आहे.
Dombivli Thakurli Bridge : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते मंगळवार 22 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद राहणार आहे.
डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने केडीएमसीकडून या पुलाची दुरुस्ती मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने केली जाणार आहे. या कामासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे. सोमवार 21फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते मंगळवार 22 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यामुळे वाहनचालकांनी डोंबिवली पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी कोपर पुलाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस ठाकुर्ली पूल बंद ठेवले जाणार असून वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलीसानी केलं आहे .
डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल आणि मंजुनाथ शाळेकडून येणाऱ्या वाहनांना जोशी हायस्कूलकडे प्रवेश बंद करण्यात येणार असून ही वाहने घारडा सर्कल- मंजुनाथमार्गे टिळक चौक, पाटणकर रोड, चार रस्ता मार्गे गिरणार चौक, म्हाळगी चौक, एस.के.पाटील चौकातुन कोपर उड्डाणपुल मार्गे डोंबिवली पश्चिमेत जातील. ठाकुर्लीकडून जाणाऱ्या वाहनांना नाना कानविदे चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने नाना कानविंदे चौकातून फडके रोडने इंदिरा चौक मार्गे ग्रिन चौकातून उजवीकडे वळण घेवून विष्णू शास्त्री चिपळुणकर रोडने वामन दिनकर जोशी चौकातुन एस.के. पाटील चौक मार्गे कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पश्चिमेकडे जातील.
डोंबिवली पश्चिमेकडुन येणारी व पुर्वेस ठाकुर्ली उड्डाणपुल मार्गे जाणाऱ्या वाहनांना बावन चाळ येथे वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे.डोंबिवली पश्चिमेकडुन येणारी वाहने बावन चाळ येथुन उजवे वळण घेवुन महात्मा गांधी रोड,डोंबिवली स्टेशन समोरून कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पुर्वेकडे जातील.