एक्स्प्लोर

बीडमधील दहशतीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल; कोयते, सत्तुराने तरुणावर वार, अश्लील शिवीगाळ

Beed Crime: या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Beed crime: बीड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच एका तरुणावर हातात कोयते आणि सत्तुर घेऊन हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, पुन्हा एकदा बीडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण एका युवकाला धमकावत असल्याचे दिसत आहे. दोघांच्या हातात धारदार कोयते आणि सत्तुर असून, ते त्या युवकाला शिवीगाळ करत धमकावत आहेत. "आता तुझ्यावर वार करतो" असे म्हणत ते त्याच्यावर धावून जातात. काही क्षणांतच त्यांनी शेख असीम या तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात असीमच्या हातावर गंभीर इजा झालीय. जखमी असीम याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्याला एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. असीमवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला टाके घालावे लागले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गुन्हा अद्याप दाखल नाही, पोलीस गप्प?

या गंभीर हल्ल्यानंतरही अद्याप बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आरोपींचे चेहरे आणि त्यांचं हिंसक वर्तन दिसून येत असतानाही पोलिसांची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बीड शहरात याआधीही अनेक वेळा धारदार शस्त्राच्या दहशतीची आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणींची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र तरीही अशा प्रकारांवर आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरतंय का, असा सवाल उपस्थित होतो आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जालन्यात क्रीडा प्रबोधनीत चार विद्यार्थिनींचा विनयभंग

 बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीवर झालेलं अत्याचार प्रकरण ताजे असताना जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गांधी चमन परिसरात असलेल्या क्रीडा प्रबोधनीमध्ये कार्यरत असलेल्या क्रीडा शिक्षकावर चार विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप झाला आहे. या प्रकरणी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी क्रीडा शिक्षकाला अटक केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Embed widget