राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसैनिकांनी डॉक्टरला चोपलं
पाकिस्तान एक शस्त्रू आहे, असं वातावरण सतत उभं करायचं. तसेच पुलवामा हल्ल्यात जे 40 जवान गेले, त्याची माहिती पुढे येईलच, पण ते राजकीय बळी ठरले आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी केला होता. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर फेसबुकच्या माध्यमातून खालच्या पातळीची कमेंट केल्याबद्दल मनसैनिकांनी एका डॉक्टराला चोप दिला आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर या मारहाण झालेल्या डॉक्टरने टीका केली होती.
औरंगाबादच्या वैजापूरमधील शत्रुघ्न थोरात पाटील असं मारहाण झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. दरम्यान मनसैनिकांनी या डॉक्टरवर शाईदेखील फेकली. माझी चूक झाली, माफ करा, अशी विनंती हा डॉक्टर करत होता. मात्र मागे पुढे न पाहता मनसैनिकांनी त्याला मारहाण केली आणि राज ठाकरेंविरोधात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल जाब विचारला. दरम्यान याबद्दल पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
व्हिडीओ- राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसैनिकांचा डॉक्टरला चोप
पुलवामा हल्ल्यात जे 40 जवान गेले, त्याची माहिती पुढे येईलच, पण ते राजकीय बळी ठरले आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी केला होता. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.संबंधित बातमी : अजित डोवालांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर पडतील : राज ठाकरे
व्हिडीओ- राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून शिक्षा | स्पेशल रिपोर्ट | पुणे
व्हिडीओ- मारहाणीचा 'मनसे' पॅटर्न | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा