एक्स्प्लोर

दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 

Ladki Bahin Yojana : ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना 'लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान या योजनेवरुन राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदने (Vishwa Hindu Parishad) देखील नवी मागणी केली आहे. ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना 'लाडकी बहीण योजनेचा लाभ  देऊ नये, अशी मागणी  विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे. नागपुरात ते शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.

लोकसंख्या नियंत्रित करायची असेल तर या योजनेत बदल करा

या संदर्भात भाष्य करताना गोविंद शेंडे म्हणाले की, महिलांना या योजनेचा लाभ होणार असला तरी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सरकारने या योजनेवर बंधन घालणे आवश्यक आहे. काही समाजाचे लोक ज्यांना दोन पत्नी आहेत, तसेच 6 मुले आहेत, त्यांना जास्त फायदा होईल आणि ज्याची एक पत्नी आहे, एक मूल आहे त्याला कमी फायदा होईल. त्यामुळे सरकारने काही अटींचा या योजनेत समावेश केला पाहिजे. असे केल्याने केवळ खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होऊ शकेल. अशी विश्व हिंदू परिषदेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. हा राष्ट्रहिताचा विषय आहे. यात धार्मिक भावना आणू नये. लोकसंख्या नियंत्रित करायची असेल सरकारने या योजनेत बदल करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आहोत, असेही गोविंद शेंडे यांनी बोलताना सांगितले.

घरबसल्या मोबाईलवर 'असा' भरा अर्ज

  • गुगलच्या प्ले स्टोअरवरून 'नारीशक्ती दूत' ॲप डाऊनलोड करा.
  • 'नारीशक्ती दूत' ॲप ओपन करा. 
  • तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी  आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून लॉगिन करा. 
  • तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या गोष्टी भरून प्रोफाईल अपडेट करा.  
  • नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडा.
  • अ‍ॅप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्या.  
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल.
  • आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची सविस्तर माहिती भरा.
  • तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • वैवाहिक स्थिती काय आहे त्याबाबत माहिती टाका. 
  • लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा. 
  • तुमचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा. 
  • आता बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा. 
  • त्यांनतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.  
  • त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराच्या हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. हमी पत्राचा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते हमीपत्र फॉर्म भरायचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
  • या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे. 
  • फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली "Accept हमीपत्र डिस्क्लेमर" यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचे आहे. 
  • त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका. 
  • या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या मोबाईलवर भरू शकता. 

आणखी वाचा 

'...तर मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा'; मनोज जरांगे यांचं मोठं विधान, सरकारवरही केला गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 20 March 2025TOP : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 20 March 2025Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!
Disha Salian Case: दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्या? 'या' स्फोटक मागणीमुळे खळबळ
Mumbai News : 30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी
Aurangzeb Nagpur: औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
औरंगजेबाने अखंड भारत निर्माण केला, चीनला लाथ मारुन कैलास पर्वत भारतात आणला; नागपूरातील हिंसाचारानंतर फईम खानच्या एमडीपी पक्षाचा अजब दावा
CIA JFK assassination: अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
अमेरिकेच्या CIA गुप्तचर यंत्रणेकडून भारतात सिक्रेट ऑपरेशन, रशियन वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा
Disha Salian Case & Aaditya Thackeray: शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
शाहरुखच्या मुलाला अटक करणारा अधिकारी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार? दिशा सालियन केसची फाईल पुन्हा उघडणार
Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी
Embed widget