एक्स्प्लोर

'...तर मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा'; मनोज जरांगे यांचं मोठं विधान, सरकारवरही केला गंभीर आरोप

Manoj Jarange Patil: धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या नोंदी रद्द करायला लावत आहेत हे लोकांना पटत नाही. हैद्राबाद गॅझेट सातारा संस्थान या ठिकाणी नोंदी आहेत. आमच्याकडून ओबसी बंधावाला (OBC) दुखावणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं. हिंगोलीमध्ये मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. सरकारने मला उघडा पडायचं आणि संपवण्याचे ठरवले आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.  कुटुंबाला मी बाजूला ठेवले आहे त्यामुळे समाजाने (Maratha Reservation) मला उघडा पाडू देऊ नये, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. 

मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा-

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले, तर सर्व जाती-धर्मातील उमेदवार देऊ, सर्व जाती धर्मातील उपमुख्यमंत्री करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा, असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. मला राजकारणात जायचं नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे. तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही आत्महत्या करत असल्याने मी खचतोय. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. 

सगळ्या आरक्षणाची पुर्नरचना झाली पाहिजे- 

सगळ्या आरक्षणाची पुर्नरचना झाली पाहिजे. मुस्लिम, ब्राह्मण आणि मारवाडी समाजाला अरक्षण दिले पाहिजे.  1884 च्या नोंदी आहेत. त्यामुळे आम्हाला समजून घ्यावे. ओबीसीच्या कोणत्याही नेत्याला विरोधक किंवा शत्रू मानलं नाही.सर्व जाती धर्माला सगेसोयरे आधीसूचना लागू होईल, असं मनोज जरांगे म्हणाले. 

आज परभणीत शांतता रॅली-

मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता ही रॅली नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून निघेल तर मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणार आहे. याच ठिकाणी रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगे उपस्थित सकल मराठा समाजाला संबोधित करणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला गडाचे स्वरूप देण्यात आलेला आहे.

मराठा कुणबी एकच- मनोज जरांगे

दरम्यान हिंगोलीतून निघालेल्या मराठा शांतता जनजागरण रॅलीत मराठा कुणबी एकच आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे असे म्हणत या रॅलीतून त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली आहे. ज्या ज्या वेळी मराठ्यांवर संकट येतील, त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीने उभा राहील. माझं राज्य सरकारला जाहीर सांगणे आहे की, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय, असं मनोज जरांगे म्हणाले.

संबंधित बातमी:

Manoj jarange : "भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget