एक्स्प्लोर

Diwali Padwa 2021 दीपोत्सव : आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, काय आहे महत्व

Diwali Padwa balipratipada 2021 : दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी  कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

Diwali Padwa balipratipada 2021 : दिवाळीची सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी  कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.  पौराणिक महत्त्व असलेल्या आणि कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवाळी पाडव्याचा सण शेतकरी राजा मोठ्या उत्साहाने साजरा करतो.  'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.  

आज 5 नोव्हेंबर शुक्रवारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा  आहे. कोरोनाचा काळ असला तरी यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. या दिवशी  खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी सोने, गाड्या किंवा संपत्तीची खरेदी केली जाते. 

काय आहे कथा
बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की,  पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
 
बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

School Re-opening : पाचवीपर्यंतचे वर्ग जुन्या वेळापत्रकानुसार भरणारPune ATS ANI : पुण्यातील कोंढव्यात एनआयए आणि एटीएस कारवाईMehboob shaikh on Dhananjay Munde : वाळूचा एकही ठेका न सोडणारे वारकऱ्यांवर बोलतात ही शोकांतिका - शेखTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni: सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Embed widget