एक्स्प्लोर
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशोक चव्हाण आणि भुजबळांमध्ये वाद, खुर्चीवरुन खटके उडल्याची चर्चा
ठाकरे सरकारच्या खातेवाटपावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या रोज कानावर येत आहे. पण आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : कॅबिनेट बैठकीदरम्यान महाराष्ट्र विकास आघाडीतल्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. खुर्चीवरुन अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांमध्ये खटके उडाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, खातेवाटपानंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक होती.
ठाकरे सरकारच्या खातेवाटपावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या रोज कानावर येत आहे. पण आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे. खुर्चीवर बसण्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळं आधिच खातेवाटपावरुन नाराजी असलेल्या ठाकरे सरकारमध्ये आता खुर्चीवरुन वादावादी सुरु झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत.
दुय्यम दर्जाचं खातं मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भुजबळ काहीकाळ कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचाही स्वीकार करत नव्हते. तसंच फोनवरुन बोलण्यासही भुजबळांनी नकार दिला. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा भार सोपवण्यात आला आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीला काँग्रेस नेते आणि खार जमिन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी पाठ फिरवली. ते नाराज असल्यानं बैठकीला अनुपस्थित राहिले असल्याचं समजत आहे. काँग्रेस नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवारांनी भाजपात यावं : चंद्रशेखर बावनकुळे | ABP Majha
वडेट्टीवार यांच्याकडे पूर्ण खार जमिनीचे खाते नाही आणि मदत व पुनर्वसन यातील फक्त भूकंप त्यांच्याकडे आहे. बाकी उर्वरित खाते राठोड यांच्याकडे आहे, त्याला सचिवही नाही. त्यानुळं नेमका कुठल्या खात्याचा पदभार स्वीकारायचा हा प्रश्न विजय वडेट्टीवार यांना पडलाय. शिवाय खातेवाटपानंतर वडेट्टीवार यांनी अजूनही माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संबंधित बातम्या :
पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला : अनिल गोटे
देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला सरकारचा ब्रेकअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement