पप्पांना रस्त्यावरून उचललं.. काकाला काही झालं तर कोण जबाबदार? संतोष देशमुखांच्या लेकीचा प्रशासनावर संतप्त सवाल
माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? असा सवाल संतोष देशमुखांच्या लेकीनं केलाय.

Beed:संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 35 दिवस उलटून गेल्यानंतर देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता आहे . संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे . गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयीत असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केलाय. गावकरी महिलांनी बीड एसपीच्या अंगावर बांगड्या फेकत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रशासनाला संतप्त सवाल केलाय . माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? आज माझे पप्पा गेले . काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं .आज जसा काका वर गेलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल .आमचा एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडत नाही . ज्यावेळी कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे आरोपींना पकडतील का? अशी आक्रमक भूमिका संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने घेतली आहे . (Dhananjay Deshmukh Protest)
टाेकाचं पाऊल उचलल्यावरच डोळे उघणार आहेत का?
आम्ही काकाशी बोललो नाहीत पण तो गेल्या चार दिवसांपासून प्रचंड तणावाखाली आहे . प्रशासनाला तो एकच सवाल करतोय,जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा .फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. नुसतच पोलीस प्रशासन येताय उभे राहतंय नक्की प्रक्रिया काय चालली आहे हे अद्यापही आम्हाला माहित नाही .आम्ही टोकाचं काही केल्यावर यांच्या डोळे उघडणार आहेत का असा सवाल ही तिने प्रशासनाला केलाय .
प्रशासनाच्या हलचालींवर वैभवी देशमुखचा संतप्त सवाल
पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा काका वर टाकीवर गेला . असं असतानाही यांना माहीत कसं नाही काका कुठे गेला ? माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचललं .अपहरण केलं .आता काकाच्या बाबतीत काही झालं तर उपयोग काय प्रशासनाचा दारासमोर असून ?अजूनही एक आरोपी फरारच आहे .हे शोध कधी लावणार ?आरोपींना अटक कधी मिळणार आम्हाला न्याय कधी मिळणार ? इतके दिवस शांतपणे न्याय मागत होतो .आता कुटुंबातील कोणीतरी टोकाचे पाऊल उचलल्यावरच न्याय देणार आहात का ?असे सवाल करत वैभवी देशमुखने प्रशासनाच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं . गावातल्या महिलांची अशी भूमिका आहे की आता ते काहीच करू शकत नसतील तर त्यांनीही हातात बांगड्या भरायला पाहिजेत . आमचा विश्वास आहे . मागणी फक्त एकच आहे की प्रशासन काय करत आहे हे आम्हाला कळवा . आम्हाला आतापर्यंत जी माहिती मिळते ती बातम्यांमधूनच मिळते . आमची मागणी हीच आहे लवकरात लवकर तपास कळवा आणि आरोपींना शिक्षा द्या .आणि न्याय मिळवून द्या .
हेही वाचा:
























