राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया, मागील दोन दिवसांपासून गिरगावात उपचार सुरू, प्रकृती स्थिर
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थीर असल्याचे माहिती आहे
Dhananjay Munde: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून पित्ताशयाच्या त्रासामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर येतंय.
पित्ताशयाचा त्रासामुळे रुग्णालयात उपचार
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे गिरगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया रविवारी पार पडली आहे. सध्या धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मागील काही दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास त्यांना होत असल्याने मुंबईतील गिरगावातील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये त्यांना हलवण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून रविवारी पित्ताशयाची पिशवी काढण्यात आली. दरम्यान, मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे .
जयंत पाटलांचा धनंजय मुंडेवर निशाणा
नुकतेच जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंना पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे, असे राजकारण कधीच केले नाही. तो आमचाच आत्मघातकी आमचा प्लॅन होता, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
Jayant Patil : 'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन', जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य