एक्स्प्लोर

अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी अमरावतीतला पोलीस अधिकारी बडतर्फ, पोलीस महासंचालकाचे आदेश

हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापूर पोलिसांकडून कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला होता.

अमरावती : अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दत्तापूरचा आरोपी ठाणेदार रवींद्र सोनोने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलं आहे. धामणगाव रेल्वे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला निलंबित करण्यात आले होते. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सध्या आरोपी रवींद्र सोनोने न्यायालयीन कोठडीत आहे. धामणगाव रेल्वेमध्ये सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदाराविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होता. या प्रकरणी आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी केली असता यामध्ये ठाणेदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणेदार राजेंद्र सोनोने मृतक मुलीच्या घरी जाऊन वारंवार मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा असं चौकशीत निष्पन्न झाल्याने ठाणेदार राजेंद्र सोनोने विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे शहरात सहा जानेवारीला सागर तितुरमारे या माथेफिरूने चाकूचे अनेक वार करून तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी सागर तितुरमारे याने स्वतःलाही चाकूने भोसकून घेतलं होतं. या प्रकरणात ज्या ठाणेदाराकडे आई-वडील आणि मुलगी माथेफिरूची तक्रार घेऊन गेले होते. त्या ठाणेदारांनी तिला सुरक्षा देण्याऐवजी वारंवार फोन करून, अश्लील बोलून, इतकचं नाही तर वारंवार कॉलेजमध्येही भेटायला जात त्रास दिला होता.

धामणगाव रेल्वेतील तरुणीच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण; आईवडिलांच्या आरोपांमुळे खळबळ

मुलीच्या आईवडिलांनी ठाणेदाराविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. हत्येपूर्वी या प्रकरणात आई-वडिलांनी दोन वेळा सागर तितुरमारे मुलीला त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याच्याविरुद्ध हत्येपूर्वी दत्तापूर पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला होता. जुलै 2019 मध्य मुलीला फूस लावून सागर तितुरमारे याने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी दत्तापूर पोलिसात केली होती. त्यावेळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनोने यांनी मुलीचा शोध लावून चार दिवसांनी परत आणले होते. त्यानंतर आम्ही दोघे आणि मुलीला नंतरची तक्रार देण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. पण आमची तक्रार घेऊन माझ्या मुलीचे मेडीकल करा आणि त्या सागर याच्यावर गुन्हा दाखल करा, असे आम्ही दोघांनीही विनंती केली. मात्र, ठाणेदारांनी आम्हाला तसे करू नका तुमच्या मुलीची बदनामी होईल असे सांगितले. तरी पण आम्ही ठाणेदाराला विनंती केली तर त्यांनी माझ्या मुलीला त्यांच्या ऑफिसमध्ये एकटीला घेऊन अडीच तास चर्चा केली आणि आम्ही आई-वडील दोघेही रात्री साडेदहापर्यंत बाहेर थांबून होतो. तरीही त्यांनी गुन्हा दाखल केलाच नाही. उलट आम्हाला सांगितले, की तुम्ही चिंता करू नका, काही होणार नाही, घरी जा मी सांभाळून घेतो, असं ठाणेदारानं म्हटलं होतं, अशी आपबीती मुलीच्या आईवडिलांनी सांगितली होती.

संतापजनक! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुलींनी तक्रार पेटीतून मांडली व्यथा

ठाणेदाराकडून मुलीला वारंवार त्रास मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की, यानंतर आम्ही काही दिवसांनी आमच्या मुलीला कॉलेजमध्ये पाठवणे सुरू केले. तेव्हा ठाणेदार हे स्वतः आमच्या घरी येऊन तुमची मुलगी सुंदर आहे, मी तिला पोलिसात लावून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांचे घरी या ना त्या कारणावरून जबरदस्ती येणे सुरू झाले. इतकच नाही तर ठाणेदार हे मुलीला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये जात होते. वारंवार तिला फोन करत होते. शेवटी मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितले, की आई ठाणेदार खूप वाईट बोलतो फोनवर त्यांना सांग की फोन नका करत जाऊ, तरी ठाणेदार यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन फोन लावणे सुरूच ठेवले. सहा जानेवारीला सागर तितुरमारे याने मुलीची निर्घृण हत्या केली, असे गंभीर आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget