साहेब गद्दारी का केली? खासदार धैर्यशील मानेंना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विचारला जाब
MP Dhairyasheel Mane : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला.
MP Dhairyasheel Mane : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. साहेब गद्दारी का केली? असा जाब यावेळी शिवसैनिकांनी खासदार माने यांना विचारला. कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे आज ही घटना घडली. यावेळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं, त्यामुळे संघर्ष टळला.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी सोबत घेत वेगळी वाट धरल्यापासून शिवसेनेतील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणही ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे शिवसेना दोन भागात विभागली गेली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून शिंदे गटातील नेत्यांना गद्दारी का केली? असा सवाल विचारला जातोय. याचाच प्रत्यय आज पुन्हा आला. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. साहेब गद्दारी का केली? असा जाब यावेळी शिवसैनिकांनी खासदार माने यांना विचारला. ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. माने यांचा ताफा आल्यानंतर ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी साहेब गद्दारी का केली? असा संतप्त सवाल उपस्थित केला. बळाचा वापर करत पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त जात होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी माने यांचा ताफा अडवला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. साहेब गद्दारी का केली? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून माने यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. याचवेळी शिंदे गटाचे समर्थकही आल्याने दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीही झाली. पण पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत संघर्ष टाळला.
धैर्यशील मानेंनी 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नुकताच कोल्हापूर दौरा पार पडला. या दौऱ्यामध्ये त्यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर बोचरा वार केला होता. धैर्यशील मानेंनी (Dhairyasheel Mane) 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी, असा बोचरा वार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इचरकरंजीमध्ये बोलताना केला होता.
खासदार धैर्यशील माने यांच्यावर राऊत यांनी चांगलीच तोफ डागली. राऊत म्हणाले की, "यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या समजले आहे. जनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही, अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा."